वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
किन्हवली:-(सावरोली)-
शंकर गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ग्रुप ग्रामपंचायत सावरोली सो. यांच्या वतीने त्यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गावातील वाद, तंटे, आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी ते प्रभावी नेतृत्व करणार आहेत.
तसेच, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरोली सो. येथील सखी सावित्री समितीचे समुपदेशक म्हणूनही त्यांची निवड झाली आहे. या भूमिकेतून ते महिला व विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे काम करणार आहेत.
या दुहेरी नियुक्तीमुळे गावच्या सामाजिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शंकर गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा, युवकांच्या मार्गदर्शन, महिला सबलीकरण आणि गावातील एकात्मता राखण्याच्या कार्यात सक्रिय आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था व ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गायकवाड हे आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ राहून कार्य करणारे एक समर्पित कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशाल घेऊन समाज परिवर्तनाच्या वाटेवर अखंडपणे चालणारा हा कार्यकर्ता आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
त्यांनी कधीही कसलीही मान-पानाची अपेक्षा ठेवली नाही. कोणतेही पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी यापेक्षा त्यांनी कार्याला प्राधान्य दिले. समाजाच्या सुखदुःखात कायम हजर राहणारा, प्रत्येक हाकेला धावून येणारा असा त्यांचा स्वभाव आहे.
समाजातील वंचित, शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने उभारली. भीम जयंती, महापरिनिर्वाण दिन, संविधान दिन यासारख्या महत्त्वाच्या दिवशी ते नेहमी अग्रेसर राहिले. शिक्षण, सामाजिक न्याय आणि मानवाधिकार यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला.
आज त्यांच्या निःस्वार्थ कार्यामुळे समाजात एक सकारात्मक ऊर्जा पसरली आहे. त्यांचे कार्य म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांची खरी अमलबजावणी होय.
शंकर गायकवाड यांनी फक्त बौद्ध समाज नव्हे तर इतर समाजातील अनेक घटकांमध्येही आपल्या कामाची एक वेगळी छाप तयार केली आहे.त्यांच्या विचारांमध्ये समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्वांचा ठाम पाया होता. त्यांनी आपल्या कार्यातून धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवता हा केंद्रबिंदू ठेवून काम केले. त्यामुळेच त्यांचे कार्य समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचले आणि लोकांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली.

Post a Comment
0 Comments