महापालिकेच्या घनकचरा विभागातील भ्रष्टाचार या मुळे पुन्हा एकता चव्हाट्यावर आला आहे.
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कल्याण :-एकाच दिवशी कल्याण डोंबिवली महापालिकेचे तीन अधिकारी लाच स्विकारता एबीसीच्या जाळ्यात सापडले आहेत. यामुळे केडीएमसीच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या जल आणि मलनिस्सारण विभागातील रविंद्र अहिरे याला 40 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. ही लाच त्याने एका विकासकाकडून स्विकारली होती. तर मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर आणि प्रभारी स्वछता अधिकारी सुदर्शन जाधव या दोघांना 20 हजार रुपये घेताना अटक करण्यात आली आहे. त्यांनी घनकचरा विभागात काम करणाऱ्या आजारी असेलेल्या एका कर्माचाऱ्यास पुन्हा कामावर हजर करुन घेण्यासाठी लाच मागितली होती. या घटनेमुळे महापालिकेतील भ्रष्ट कारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. महापालिकेत आत्ता पर्यंत 47 अधिकारी- कर्मचारी यांना रंगेहात लाच घेताना पकडले आहे.
महापालिकेच्या महापालिकेच्या जल मल निस्सारण विभागात रविंद्र आहिरे हा उपअभियंता पदावर कार्यरत आहे. त्याने एका विकासकाला एनओसी देण्याच्या बदल्यात पैशाची मागणी केली होती. त्यासाठी त्याने विकासकाकडून 40 हजार रुपयांची लाच मागितली. ती स्विकारता एसीबीने त्याला रंगेहात पकडले आहे. तर घनकचरा विभागात मुख्य स्वच्छता अधिकारी या पदावर वसंत देगलूरकर आणि प्रभारी स्वच्छता अधिकारी पदावर सुदर्शन जाधव हे दोघे कार्यरत आहे. त्यांनाही आजच लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
घनकचरा विभागात एक कर्मचारी आजारी होता. त्याला पुन्हा कामावर हजर करुन घेण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी कर्मचाऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या ठाणे विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने प्राप्त तक्रारीच्या आधारे सापळा रचला होता. सर्वोदर मॉल परिसरात महापालिकेचे घनकचरा विभागाचे कार्यालय आहे. याच कार्यालयात या दोघा अधिकाऱ्यांना 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगे हात पकडले आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागातील भ्रष्टाचार या मुळे पुन्हा एकता चव्हाट्यावर आला आहे. घनकचरा विभागात अनेक कर्मचारी कामावर हजर न होता, त्यांची हजेरी लावतात. त्या बदल्यात ते अधिकारी वर्गाला पैसे देतात. तसेच काही आजारी कर्मचारी असतात. त्यांच्या आजारपणाच्या सुट्टीनंतर त्यांना हजर करुन घेण्यासाठी अधिकारी वर्गाकडून पैशाची मागणी केली जाते. मुख्य स्वच्छता निरिक्षक देगलूरकर आणि जाधव या दोघांनीही आजारी कर्मचाऱ्याकडून 25 हजाराची लाच मागितली होती. 20 हजार रुपये स्विकारता त्यांना अटक केली आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या घनकचरा विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. या भ्रष्टाचाराला महापालिका आयुक्त अभिनव गोयल हे कशा प्रकारे आळा घालतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Post a Comment
0 Comments