वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
मनोहर गायकवाड
🚨🚨🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨🚨🚨
◆ शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज, 14 ऑगस्ट रोजी औरंगाबाद खंडपीठात पार पडणार आहे.
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी या सकाळपासूनच न्यायालयात उपस्थित राहून कारवाईवर लक्ष ठेवून आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आजची ही पहिलीच सुनावणी असून, या सुनावणीत पुढील कार्यवाहीचा मार्ग ठरणार आहे.
पीडित सूर्यवंशी कुटुंबियांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर न्यायालयात जोरदार युक्तिवाद करणार असून, अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही न्यायालयाबाहेर उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत.
या प्रकरणाला संपूर्ण राज्यातील कायदा व सुव्यवस्था, तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या लढ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.


Post a Comment
0 Comments