वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
ठाणे – बुद्धभूमी फाउंडेशन हे बौद्धांचे जागतिक बौद्ध स्थळ असून, भविष्यात येथे उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक वास्तू बौद्ध समाजाच्या हितासाठी, बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडणाऱ्या स्वरूपात असणार आहे. ऐतिहासिक कल्याण नगरीत बौद्धांचे हे केंद्र भविष्यातील एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध स्थळ ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणाचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्ह्यातील सर्व बौद्ध समाजाने संघटित होऊन बुद्धभूमीच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कागदपत्रे आणि न्यायालयीन लढाईसाठी भदंत गौतम रत्न महाथेरो यांनी पूर्ण तयारी केलेली आहे. मात्र, त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मनुष्यबळाची अत्यंत गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. "तुम्ही जर साथ दिली, सोबत उभे राहिलात, तर हा लढा आपण नक्कीच जिंकू शकतो. तुमचा सक्रिय सहभाग हाच सर्वात मोठा उपयोग ठरेल," असे आयोजकांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काल झालेल्या बेकायदेशीर कारवाई संदर्भात सविस्तर चर्चा करून योग्य तो मार्ग शोधण्यासाठी आज (गुरुवार) सायंकाळी ६ वाजता सर्वांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments