वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शेख हसन
खामगाव – बर्डे प्लॉट परिसर, प्रभाग क्रमांक 16 येथील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज या रस्त्यावरून जाणे ही मोठी समस्या बनली आहे. खड्डेमय रस्ते, पावसाचे पाणी आणि चिखल यामुळे पादचारी व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
![]() |
स्थानिक नागरिक मोहम्मद मोसिम, मोहम्मद जाकीर, शेख वसीम, शे. करीम, शेख समीर, सय्यद अमीन आणि सोहेल पठाण यांनी सांगितले की, या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे स्थानिक आमदार तसेच नगरसेवक यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर वृद्ध, रुग्ण व कामावर जाणाऱ्या लोकांनाही मोठा त्रास होत आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.



Post a Comment
0 Comments