वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
संपादकीय
शहापूर (दि. 13 ऑगस्ट)– भारतीय स्टेट बँक, शहापूर शाखेतर्फे दुपारी 3 वाजता सारंगपुरी ग्रामपंचायत येथे आर्थिक समावेशन शिबिर व मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरास भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक (CGM) श्री. संदीप कुमार, भारतीय स्टेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक (DGM) श्री. सुरजित त्रिपाठी, DGM – FI श्री. दया शंकर, RM कल्याण क्षेत्र श्री. राजेश कुमार, शहापूर शाखा प्रमुख सौ. श्वेता सावंत, तसेच सारंगपुरी ग्रामपंचायत सरपंच श्री. नारायण दरोडा, उपसरपंच श्री. किशोर ठाकरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
शिबिरात बँकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून शासनाच्या विविध योजना जसे निष्क्रिय खाते सुरु करणे, जुन्या खात्यांची KYC अद्ययावत करणे, सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना, अटल पेन्शन योजना आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नीलेश लाडे यांनी केले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल शाखा प्रमुख सौ. श्वेता सावंत यांनी आभार मानत शिबिराचा समारोप केला.



Post a Comment
0 Comments