वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
संपादकीय
कल्याण : एखादा विषय हातात घेतला, तो सोडवल्याशिवाय शांत बसायचं नाही — या भूमिकेतून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत बाई रुक्मिणी हॉस्पिटल येथे सहा नवीन ॲम्बुलन्स रुग्ण सेवेसाठी दाखल करण्यात आल्या आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी KDMC प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) संघटनेची संयुक्त बैठक पार पडली होती. राज्य महासचिव ऍड. डॉ. केवलजी ऊके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव गिते यांनी शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधा वाढविण्यासह नवीन ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
या मागणीच्या अनुषंगाने 15 ऑगस्ट 2025 रोजी सहा नवीन ॲम्बुलन्स KDMC मार्फत बाई रुक्मिणी हॉस्पिटल, कल्याण येथे सुपूर्द करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी NDMJ संघटनेचे नेते शशी भाऊ खंडागळे आणि भाऊराव तायडे उपस्थित होते.
राज्य सचिव वैभव गिते यांनी KDMC आयुक्त अभिनव गोयल, प्रमुख वैद्यकीय अधिकारी दीपा शकला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
सदर माहिती NDMJ ठाणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदेशजी भालेराव यांच्याकडून प्राप्त झाली




Post a Comment
0 Comments