वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मुंबई – 76 लाखांच्या आश्चर्यकारक मतदानवाढीविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्याने, आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी विरोधी पक्षांना आवाहन केले आहे की, फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, तर कोर्टातूनच निकाल मिळवावा लागेल.
आंबेडकर म्हणाले की, “जेव्हा आम्ही विरोधी पक्षांना पत्र लिहून कळविले की आपण हायकोर्टात जाऊन निवडणूक आयोगाला विचारू की, जर कागदपत्रे नसतील तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष कशी झाली, हे आम्हाला सांगा — तेव्हा कोणीही आमच्या बाजूने उभे राहिले नाही. मतदान संपल्यानंतर 76 लाख मतांची वाढ झाली आहे का, हा प्रश्न उपस्थित केला, पण त्यावेळीही साथ मिळाली नाही.”
त्यांनी स्पष्ट केले की, “आमची याचिका हायकोर्टाने फेटाळली असली तरी आम्ही सुप्रीम कोर्टात ती दाखल केली आहे. या याचिकेत तरी विरोधी पक्षांनी एक पक्षकार म्हणून सहभागी व्हावे. जर तुमचा लढा खरा असेल, तर 76 लाख आश्चर्यकारक मतदानवाढीविरोधातील सुप्रीम कोर्टातील याचिकेत सहभागी व्हा. न्याय मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाला कोर्टाच्या माध्यमातूनच प्रश्न विचारता येतात.”
वंचित बहुजन आघाडी प्रमुखांनी विरोधी पक्षांना सूचित केले की, लोकशाहीच्या संरक्षणासाठी हा लढा केवळ रस्त्यावर नाही तर न्यायालयातही लढावा लागेल.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
जाहिरातीसाठी संपर्क : 8830708522


Post a Comment
0 Comments