वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
प्रतिनिधी : बुलढाणा जिल्हा प्रमुख शेख हसन
अकोला – वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर व प्रदेश महासचिव अरूंधतीताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन महिला आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. जिल्हाध्यक्षा व माजी जि. प. समाजकल्याण सभापती सौ. आम्रपालीताई खंडारे आणि जिल्हा महासचिव व माजी जि. प. अध्यक्ष सौ. संगीताताई अढावू यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.
या कार्यक्रमात उपजिल्हा पोलिस अधिक्षक, पोलिस बंधु-भगिनींना देखील राखी बांधून ‘मानवी हक्कांचे रक्षण’ करण्याची जाणीव करून देण्यात आली. “आम्ही महिला अबला नसून सक्षम आहोत, त्यामुळे केवळ रक्षणाची अपेक्षा न ठेवता समानतेच्या दृष्टीकोनातून समाज व पोलीस प्रशासन कार्य करावे,” असा संदेश या वेळी देण्यात आला.
महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, समाजात काही वेळा ‘रक्षक’ भक्षकात बदलतात, त्यामुळे पोलीस खात्याने नागरिकांच्या हक्कांचा सन्मान राखणे गरजेचे आहे. पुणे पोलिसांनी महिलांशी गैरवर्तन केल्याची घटना उदाहरण म्हणून देत, रक्षाबंधन सणाच्या माध्यमातून पोलीस दलाला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देण्यात आली.
या वेळी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातील सर्व महिला-पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यात माजी जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट, जिल्हा संघटक अनुराधाताई ठाकरे, महानगर अध्यक्षा सौ. वंदनाताई वासनिक, माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती सौ. मायाताई नाईक, जिल्हा उपाध्यक्षा मिनाक्षीताई शेळके, दुर्गाताई अवचार, सौ. वैशालीताई सदांशिव, अकोला तालुकाध्यक्ष मंगलाताई शिरसाट, विद्याताई धाडसे, तेजस्विनी बागडे, सरोजताई वाकोडे आदींचा समावेश होता.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे यांनी पक्षाचे प्रकाशित पत्र वाचन केले. पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी सर्व उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना बक्षिसे देऊन ओवाळणी स्वीकारली. ओवाळणीमध्ये महिला आघाडीच्या वतीने केवळ एवढीच अपेक्षा व्यक्त करण्यात आली – “रक्षकच भक्षक होऊ नयेत.”



Post a Comment
0 Comments