![]() |
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
रितेश साबळे
महिला आणि पुरुष पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी येत्या ११ आणि १२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे करण्यात येणार असून, या दिवशी पोलिसांना राखी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या की, “जे खाते नागरिकांच्या संरक्षणासाठी स्थापन झाले आहे, तेच जर महिलांचा सन्मान न राखता त्यांना अवहेलना करत असेल, मारहाण करत असेल, त्यांच्या फोनची तपासणी करत असेल आणि सार्वजनिक ठिकाणी घटना न घडल्याचे कारण देऊन FIR दाखल करण्यास नकार देत असेल, तर हे अत्यंत अनुचित आहे.”
प्रा. आंबेडकर पुढे म्हणाल्या, “या रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांना केवळ भाऊ म्हणून राखी बांधली जाणार नाही, तर त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली जाणार आहे. नागरिकांच्या संरक्षणासाठी स्थापन झालेल्या या खात्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. एक अबला म्हणून नाही, तर एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही हा संदेश देणार आहोत की, पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर करू नये.”
या अनोख्या उपक्रमामुळे पोलिस दलात जबाबदारीची भावना दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
मुख्य संपादक : सागरजी रोकडे सर .
सहसंपादक : संदेशजी भालेराव सर .
कार्यकारी संपादक : रितेश साबळे, औरंगाबाद.
जाहिरातीसाठी संपर्क : 88 30 70 85 22 .



Post a Comment
0 Comments