वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
सावरोली (ता.शहापूर) – ग्रुप ग्रामपंचायत सावरोली सो कार्यालयामध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय भांगरे साहेब, आदरणीय बिरसा मुंडा साहेब आणि आदरणीय मुकणे राजे या क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली.
कार्यक्रमात मुगाव शाळेचे आदर्श शिक्षक नरेश राऊत सर यांनी जागतिक आदिवासी दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व यावर भाष्य केले. त्यांनी आदिवासी समाजाच्या संघर्षमय इतिहासाचा आणि हक्क व प्रगतीसाठी आजच्या पिढीची जबाबदारी याचा उल्लेख केला.
![]() |
तसेच तंटामुक्ती अध्यक्ष मा. शंकर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करत आदिवासी संस्कृती, परंपरा आणि एकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच मा. मधुकर निरगुडे, उपसरपंच मा. जयवंत दवणे, ग्रामसेविका मा. राऊत मॅडम, सदस्य सौ. सविता खोडका, पांडू सपरा, लक्ष्मण हिंदूला, भारतीय बौद्ध महासभा शाखा सावरोलीचे अध्यक्ष यशवंत धनगर, पाणीपुरवठा समितीचे माजी अध्यक्ष जगन दवणे, विठ्ठल खोडका, कर्मचारी निखिल मांडला, लक्ष्मण दवणे, सुखदेव निरगुडे, सचिन दवणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि एकतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.




Post a Comment
0 Comments