वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
खालापूर, रायगड –
जागतिक आदिवासी दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे 9 ऑगस्ट 2025 रोजी भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व गावांमधील हजारो आदिवासी बांधव व भगिनी पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. दिवसभर मुसळधार पावसातही तब्बल आठ तास उभे राहून सहभाग घेतलेल्या बांधवांनी आदिवासी ऐक्याचे दर्शन घडवले. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आदिवासी परंपरा, संस्कृती, महापुरुष बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल यांच्यावरील गाणी व नृत्य सादर करण्यात आली.
या प्रसंगी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र शासनाकडे 9 ते 14 ऑगस्टदरम्यान जागतिक आदिवासी दिन सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचा शासन निर्णय तात्काळ घेण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
गिते यांनी शासनाच्या धोरणांवर टीका करताना म्हटले की, अनेक नकली आदिवासी जातीचे दाखले घेऊन बिगर आदिवासी शासकीय नोकऱ्या व जागांवर कब्जा करत आहेत. यावर कडक चौकशी व कारवाई व्हावी, आदिवासींचा निधी इतरत्र वळवू नये, ॲट्रॉसिटी ॲक्टची कडक अंमलबजावणी व्हावी, तसेच आरोग्य व शिक्षणाच्या गंभीर प्रश्नांवर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
कार्यक्रमासाठी खालापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भर पावसातही दांडगे आयोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या आयोजकांचे उपस्थितांनी कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी आदिवासी ठाकूर समाज संघटना चे रायगड जिल्हा अध्यक्ष मालू निरागुडे, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस चे राज्य निरीक्षक बी.पी. लांडगे, खानापूर तालुका अध्यक्ष नारायण निरगुडा, तालुका सचिव रवी बांगरे, तालुका खजिनदार राम शिंगावा, सहसचिव राजू सुतक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ निरगुडा, समन्वय समिती अध्यक्ष अनंता वाघमारे, बिरसा ब्रिगेड सचिव सचिन वाघमारे, जिल्हा सदस्य पांडुरंग देहू पारधी, रामा निरगुडा, प्रदीप जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
वैभव तानाजी गिते
राज्य सचिव, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
📞 8484849480




Post a Comment
0 Comments