वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
खामगाव ( शेख हसन ):- तालुक्यातील बुद्ध विहार गाडगाव येथे समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवा भाऊ हिवराळे हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये, भारतीय बौद्ध महासभा संरक्षण राज्य सचिव रवींद्र इंगळे, भीमराव तायडे, विशाखा सावंग महिला जिल्हाध्यक्ष ,भीमराव तायडे, केके शेगोकार, मोहित दामोदर,भंते राज ज्योती, व त्यांच्या संघ हे होते, सर्वप्रथम भंते राज ज्योती यांनी सर्व उपासक-उपासिकांना त्यांना पंचशील देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली .
महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी हा लढा संपूर्ण ताकतीने राबवला जाईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, जिल्हा उपाध्यक्ष गौतम इंगळे ,गिरीश उमाळे जिल्हा उपाध्यक्ष , उमेश इंगळे, दीपक वीरघट , पवन तेलंग भिकाजी ईखारे, रमेश गवारगुरु, अनिल सावदेकर , हे सहभागी होते, या समारोप कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धम्म बांधव उपस्थित होते,
महाबोधी महा विहार जनजागृती मुक्ती आंदोलन करण्यासाठी खामगाव शेगाव तालुक्यातील 130 गावांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली. या महा अभियान कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वंचित बहुजन युवा आघाडीचे, जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ वाकोडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रकार गौतम इंगळे, गिरीश उमाळे जिल्हा उपाध्यक्ष , विनीत, पवन तेलंग, युवा जिल्हा सदस्य, उमेश इंगळे तालुका अध्यक्ष युवा आघाडी शेगाव, दीपक विरघट महासचिव शेगाव, अनिल सावदेकर भा. बौद्ध महासभा सचिव शेगाव, रमेश गवारगुरु मा.तालुकाध्यक्ष भा. बौ महासभा खामगाव, भिकाजी इखारे मा. ता. उपाध्यक्ष भारिप शेगाव, यांचे सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments