वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
प्रतिनिधी : शेख हसन
बाळापुर तालुक्यातील निंबा गावात पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून मातंग समाजातील सौ. संगीता महादेव गवई या महिलेला गावातील गुंड प्रवृत्तीच्या सुधाकर गोटराम तायडे याने घरात घुसून बेदम मारहाण केली. पीडित महादेव गवई हे दिव्यांग असून अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत आहेत.
सुधाकर तायडे याचा स्वभाव गुंडगिरीचा व सनकी असल्याने गवई कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रार उरळ पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली. तथापि, पोलिसांनी आरोपीविरुद्ध कारवाई न करता केवळ एनसी दाखल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
यावर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन तायडे यांनी संताप व्यक्त करत आरोपीवर तत्काळ भारतीय दंड संहिता कलम 354 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उरळ पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
📞 संपर्क : 9021293992 – गजानन तायडे, संस्थापक अध्यक्ष, अण्णाभाऊ साठे क्रांती सेना


Post a Comment
0 Comments