Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

सर्वांना घरकुल, मोफत उपचार व सुरक्षितता – अलिबागमध्ये दक्षता समितीच्या बैठकीत ठोस निर्णय* *वैभवजी गिते...


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

मोहन दिपके 

 *रायगड (दि. २६ ऑगस्ट) –* उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी मा. मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे दक्षता व नियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.


या बैठकीत मुरुड व अलिबाग तालुक्यातील तहसीलदार, *गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP), कृषी अधिकारी* यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार दिलेल्या १ ते ४७ मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.


 *मा. वैभव गीते साहेब* यांनी संबंधित मुद्द्यांवर मार्गदर्शन करत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर प्रांताधिकारी चव्हाण यांनी गीते साहेबांनी सुचविलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व संबंधित विभागांना दिले.


बैठकीत सर्व जाती-धर्मांतील नागरिकांना दर्जेदार व मोफत उपचार मिळावेत, सर्वांना घरकुले उपलब्ध व्हावीत व घरकुलांसाठी शासकीय जागा निश्चित व्हावी यावर सकारात्मक चर्चा झाली. तसेच मागासवर्गीयांवरील अन्याय व अत्याचारास आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेशही देण्यात आले.


 या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार अलिबाग यांच्यासह मा. वैभव गीते, संजय सोनवणे, आनंद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. 



Post a Comment

0 Comments