वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
शेख हसन
खामगाव : दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा खामगाव येथे बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत स्थळ – कोल्हटकर स्मारक येथे खामगाव तालुका कलावंत विकास समिती यांच्या वतीने महाकवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत आंबेडकरी कलाकार सहभागी होणार असून त्यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांचे शाहिर काव्य व गीतांवर आधारित सुरेल गाण्यांचा वर्षाव प्रेक्षकांवर होणार आहे.
कार्यक्रमात राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल दादा महाले (औरंगाबाद), महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी मनोजराजा गोसावी (यवतमाळ), सुप्रसिद्ध गायक सुभाष ओझलवार (मुंबई), सुप्रसिद्ध गायक नारायणदादा सावळेदकर (भंडारा), सुप्रसिद्ध गायक देवदत्त अभंग (वर्धा), सुप्रसिद्ध गायक अशोकदादा भंडाळे (मुंबई), गायक प्रा. डॉ. किशोर वाघ (औरंगाबाद), सुप्रसिद्ध गायक सुगंधराज दाभाडे (खामगाव), सुप्रसिद्ध गायक मेघराज इंगळे (औरंगाबाद), सुप्रसिद्ध संविधान गायक मनोहर अमरावती, सुप्रसिद्ध गायक विकासराजा नागपुरे (नागपूर), गायक कुलभूषण बर्वे (औरंगाबाद), सुप्रसिद्ध गायक अजय ढेकळे (औरंगाबाद) आदींचा सहभाग असणार आहे.
तसेच सुप्रसिद्ध गायिका निशा धोंडे (चंद्रपूर), गायिका रीता खोडरे (अकोला), गायिका सुषमा वाघमारे (संपनाळा-खामगाव), गायिका धम्मानंद शिरसाठ (मलकापूर) या देखील आपल्या सुरेल आवाजात गाण्यांचा सुरेल प्रपंच सादर करणार आहेत.
या सांगीतिक कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध कलाकार व गायक-गायिका आपली कला सादर करून प्रबोधनात्मक गाणी गाणार आहेत.


Post a Comment
0 Comments