Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

एसीचा स्फोट अन् घरात आग, पल्लवीच्या होरपळून मृत्यू..



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

सोलापूर : एसीचा स्फोट झाल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात गडगी नगरमध्ये हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. एअर कंडिशनरचा स्फोट झाल्यामुळे चाळीस वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पल्लवी प्रवीण सग्गम, वय 40 वर्षे, रा गाडगी नगर, सुवर्ण कळस, सोलापूर, असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. घरातील एअर कंडिशनरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर आग नेमकी कशी भडकली, याचा कसून तपास सुरु आहे.

पल्लवीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

घरकाम करत असताना आग

स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने पल्लवी प्रवीण सग्गम घरीच होत्या. गुरुवारी दुपारी त्या घरातील कामं करत असताना अचानक त्यांच्या घरातील एसीचा स्फोट झाला. स्फोटानंतर काही काही कळायच्या आत शॉर्टसर्किट झाले आणि आग वेगाने घरात तत्काळ पसरली. आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की, त्यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.


आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहिल्यानंतर आरडाओरड सुरु केली. अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण पल्लवी यांचा होरपळून मृत्यू झाला.

भाजलेल्या अवस्थेत पल्लवीचा मृतदेह बाहेर काढला

जुना विडी घरकुल परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घरात तपासणी केली असता, पल्लवी सग्गम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आला.




Post a Comment

0 Comments