वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
डोळखांब (ता. शहापूर) – हेदवली गावातील जिल्हा परिषद शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा प्रांगणात सकाळी ध्वजारोहण करून राष्ट्रगीताच्या स्वरात कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या वेळी गावचे पोलीस पाटील रामचंद्र दत्तात्रय फर्डे, ज्येष्ठ नागरिक लहू हरी फर्डे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बनेशभाई लोखंडे, किसनजी चौधरी, अशोक फर्डे, गुरुनाथ फर्डे, सुधीर देसले, स्वप्नील फर्डे, साहिल लोखंडे, विशाल फर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या शिक्षिका घरत मॅडम, भोईर मॅडम तसेच अंगणवाडी सेविका गोडांबे मॅडम, निमसे मॅडम यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. शेवटी प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Post a Comment
0 Comments