Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

अकोला : धनगर समाजाच्या युवकांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

शेख हसन 

अकोला जिल्ह्यातील धनगर समाजाचे युवा नेते आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली आहे. या प्रवेश सोहळ्यात धनगर समाज युवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सुमित नवलकार आणि युवा सेना उपजिल्हा प्रमुख रविराज घोंगे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश झाला.




या प्रसंगी उपसरपंच भगवन पातोंड, सरपंच शिवदास पांडे, प्रशांत पातोंड, अनिल बाहे, चेतन दिवणाले, तेजस कात्रे, सचिन कोगदे, संजय गव्हाळे, विठ्ठल नांदूरकर, अवधूत नागे, गणेश नागे, श्याम पातोंड, संदीप सुशीर, तेजराव शिंदे, गोपाल नवलकार, चिंतामण पातोंड, अमोल घोंगे, मार्तंड साबळे, मंगेश साबळे, सोनु भदे, अक्षय घटाळे, प्रमोद पातोंड, अमोल कात्रे, सुभाष कळंब, ऋत्विक दिवणाले आणि प्रफुल दिवणाले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



धनगर समाजाच्या या सामूहिक प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीला अकोला जिल्ह्यात आणखी मजबुती प्राप्त झाली आहे.






Post a Comment

0 Comments