वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
संपादकीय
आळवे (ता. मुरबाड) – आळवे येथील बौद्ध वस्तीमध्ये आज (दि. १५ ऑगस्ट) डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वाराचे भव्य लोकार्पण उत्साहात पार पडले. गावातील मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याचे वातावरण देशभक्ती व अभिमानाने भारून गेले होते.
या प्रवेशद्वाराचे उद्घाटन मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती दत्तूजी वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेळूक ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच गणेशजी वारघडे, संदीपजी वारघडे, जनार्दन वारघडे, मुस्ताक शेख, आळवे गावचे पोलीस पाटील किरण सोनवणे, हरिश्चंद्र वारघडे, भगवान मोरे, भास्कर हरड, मोहन चौधरी, सुभाष चौधरी, वामन गायकवाड, विजय उबाळे, धनाजी गायकवाड, अरुण गायकवाड, अतुल चौधरी, गौरव गायकवाड, सम्राट उबाळे, भावेश गायकवाड, राज गायकवाड, पूजा गायकवाड, करुणा गायकवाड, रविना थोरात, रोहिणी कांबळे, राणी गायकवाड तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशद्वाराच्या उभारणीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांना आणि योगदानाला आदरांजली वाहण्याचा हेतू असल्याचे आयोजक कुमार थोरात यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाची झलक दिसून आली.
सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी उत्साहाने सहकार्य केले.



Post a Comment
0 Comments