वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
कार्यकारी संपादक:- रितेश साबळे
जनुना (ता. खामगाव) : आज दिनांक २८ ऑगस्ट २०२५ वार गुरुवार रोजी जनुना गावातील संत गजानन महाराज मंदिर येथे ऋषी पंचमी व संत गजानन महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले. सकाळपासून मंदिर परिसर भक्तांच्या गजराने आणि ओढ्याने गजबजून गेला होता.
सदर महाप्रसादाचा लाभ गावातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने घेतला. महाप्रसादामध्ये खास करून पुरणपोळी व खीर यांचा समावेश होता. स्वादिष्ट व पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेत भाविकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंदिराचे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ मंडळी व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मंदिर परिसर स्वच्छतेने व फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद ग्रहण केला.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व भक्तांनी अशा धार्मिक सोहळ्यामुळे गावात एकोपा, श्रद्धा व भक्तीभाव वृद्धिंगत होत असल्याचे सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल जनुना ग्रामस्थांच्या वतीने संत गजानन महाराज मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे विशेष आभार मानण्यात आले.





Post a Comment
0 Comments