वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शहापूर : अनंता भोईर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. अजित दादा पवार साहेब आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार तथा अध्यक्ष, अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) श्री. दौलतजी दरोडा साहेब यांच्या सन 2023-24 च्या निधीतून मंजूर विविध कामांचे लोकार्पण सोहळा चेरपोली स्मशानभूमी येथे पार पडला.
या वेळी चेरपोली स्मशानभूमी येथे साकव बांधणे तसेच पवारनगर, यमुनानगर, राहुलनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे लोकार्पण आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचे चिरंजीव तथा आमदार दौलतजी दरोडा युवामंच अध्यक्ष करणजी दरोडा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
![]() |
कार्यक्रमात पवारनगर ग्रामस्थांच्या वतीने करणजी दरोडा साहेब व माजी उपसरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरचे संचालक श्री. जगदिशजी पवार यांचा विकासकामांसाठी केलेल्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्याबद्दल सत्कार करण्यात आला.
![]() |
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा संपर्क प्रमुख श्री. तुकाराम वेखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेश दादा विशे, आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री. रोहिदासजी शेलार, माजी उपसरपंच श्री. राम भोईर, श्री. आशिष पाटील, आमदार साहेबांचे कट्टर समर्थक श्री. किसनमामा पडवळ, श्री. अशोकजी कुडव यांच्यासह पवारनगर व जे. डी. पार्क येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments