Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

राजश्री विद्यालय वाळुज (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे अमानुष प्रकार



वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

रितेश साबळे 

शिक्षण व्यवस्थेत जातीयवाद संपुष्टात यावा अशी अपेक्षा असताना, अजूनही काही ठिकाणी त्याचे कुरूप रूप दिसून येते. गंगापूर तालुक्यातील वाळुज येथील राजश्री विद्यालय या खाजगी शिक्षण संस्थेत घडलेली घटना याचेच उदाहरण आहे.


या शाळेत शिक्षण घेणारा ऋतुराज मिलिंद कांबळे हा मागासवर्गीय (बौद्ध) समाजातील विद्यार्थी असून त्याला आरटीई (RTE) योजनेतून प्रवेश मिळालेला आहे. मात्र, संस्थेचे चालक सुरेश वाघचौरे आणि संबंधित शिक्षक आरटीई विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याला शाळेत वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता. इतकेच नव्हे तर शिक्षक शहा यांनी त्या विद्यार्थ्याला वर्गातून बाहेर काढून अमानुष मारहाण केली. या मारहाणीमध्ये विद्यार्थ्याला पायाने तुडविण्यात आले, तसेच हात धरून ओढत नेण्यात आले. काठी तुटेपर्यंत मारहाण झाल्याने विद्यार्थी अक्षरशः शिक्षकाच्या पाया पडून जीव वाचविण्याची भीक मागत होता.



याप्रकरणी संस्थाचालकाला सर्व माहिती असूनही त्यांनी पालकांचा फोन न घेता कोणतीही सहानुभूती व्यक्त केली नाही, अशी गंभीर तक्रार पालकांनी केली आहे. तसेच या शाळेत आरटीई विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे फी आकारली जाते, उत्सव साजरे करण्याला जास्त प्राधान्य दिले जाते, ऑनलाईन फी स्वीकारली जात नाही, शाळेला खेळाचे मैदान नाही, अशा अनेक गैरप्रकारांची उघडकीस आली आहे.


सदर संस्थेच्या अध्यक्षांना राजकीय वरदहस्त असल्याने ते गावातील नागरिकांच्या तक्रारीकडेही दुर्लक्ष करतात, अशी माहिती समोर आली आहे.


मागासवर्गीय विद्यार्थ्याला जातीयद्वेषातून अमानुष मारहाण करणाऱ्या संबंधित शिक्षक आणि संस्थेविरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व पालकांकडून होत आहे. तसेच या जातीयवादी शाळेला तातडीने कुलूप ठोकावे, अशीही जनतेची जोरदार मागणी आहे.



Post a Comment

0 Comments