वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
डोळखांब
शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे आज श्रमजीवी संघटनेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन संस्थापक श्रमजीवी संघटना तसेच अध्यक्ष (मंत्री दर्जा), राज्य स्तरीय आदिवासी विकास आढावा समिती, महाराष्ट्र शासन आदरणीय श्री. विवेकभाऊ पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर तसेच पोलीस दूरक्षेत्र डोळखांब येथे हा स्वच्छता उपक्रम पार पडला. या अभियानात श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते लक्ष्मण चौधरी, कैलास मुकणे, कमलाकर शिंदे, संजय मुकणे, राम हिलम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या स्वच्छता उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, समाजोपयोगी उपक्रमाद्वारे विवेकभाऊ पंडित यांचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments