वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
सावरोली (शंकर गायकवाड):
सावरोली- टाकी पठार रोडचे रुंदीकरण याच वर्षी मार्च महिन्यात करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच पहिल्याच पावसात रस्त्यावरील डांबर उखडून खडी बाहेर पडली असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "जर अशाच प्रकारची कामे होणार असतील, तर अशी कामे न करण्यासच बरी," अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. विकासाच्या नावाखाली ठेकेदारांचा विकास होत असून जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
तालुक्यात अशा प्रकारची अनेक कामे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे यापुढे अशी निकृष्ट दर्जाची कामे होऊ नयेत, याकडे संबंधित विभागाने व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.


Post a Comment
0 Comments