Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

धर्माच्या आड अत्याचार : अल्पवयीन मुलीवर धर्मगुरूचे पाशवी कृत्य


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻

{संपादकीय}


पालघर परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. समाजाच्या श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या एका धर्मगुरूंनीच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिक मोठ्या प्रमाणावर आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांचा धर्मगुरूंवर विश्वास असल्याने तो त्यांच्या घरी ये-जा करत असे. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर नागरिक संतप्त झाले असून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.


स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.


सदर घटनेमुळे धार्मिक आस्थेला तडा बसला असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. समाजमाध्यमांवरही या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून “आरोपीस कठोर शिक्षा द्यावी” अशी मागणी होत आहे.






Post a Comment

0 Comments