वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
नवी दिल्ली : जुन्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार आता वाहनधारकांना आपल्या गाड्या १५ वर्षांऐवजी तब्बल २० वर्षांपर्यंत नोंदणी करून वापरण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र या सोयीबरोबरच थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे.
काय बदलले?
आतापर्यंत वाहनाची नोंदणी कमाल १५ वर्षांपर्यंत वैध होती. त्यानंतर वाहन वापरायचे असल्यास ती नव्याने रजिस्टर करावी लागत असे. आता नवीन नियमांनुसार वाहनधारकांना २० वर्षांपर्यंत गाडी चालवता येईल. १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवी नोंदणी करून आणखी ५ वर्षे वाहन वापरण्याची संधी मिळेल.
नोंदणी शुल्क किती?
सरकारने ठरवलेले नूतनीकरणाचे शुल्क असे :
मोटरसायकल : ₹2,000
तीन-चाकी : ₹5,000
कार (लाइट मोटर व्हेईकल) : ₹10,000
इम्पोर्टेड २ किंवा ३ चाकी वाहन : ₹20,000
इम्पोर्टेड ४ किंवा अधिक चाकी वाहन : ₹40,000
इतर वाहने : ₹15,000
दिल्ली-NCR मध्ये सवलत नाही
ही नियमावली देशभर लागू होणार असली तरी दिल्ली-NCR मध्ये याला सूट नाही. प्रदूषण नियंत्रणासाठी या भागात आधीपासूनच जुन्या वाहनांवर कठोर निर्बंध आहेत.
सरकारचा हेतू
सरकारचा उद्देश रस्त्यांवरील प्रदूषण कमी करणे, धोकादायक व जुनी वाहने हटवणे आणि नागरिकांना वेळेवर नोंदणीस प्रवृत्त करणे हा आहे. यामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच रस्ते सुरक्षाही मजबूत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.



Post a Comment
0 Comments