Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातून रक्तरंजित हल्ला.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

रितेश साबळे 

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ ऑगस्ट :

संभाजीनगर येथील सिडको ऑड साईज प्लॉट, संभाजी कॉलनी भागात कौटुंबिक वादातून चक्क रक्तरंजित हल्ल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती वादातून सुरू झालेला वाद चिघळत गेला. आरोपींच्या वडिलांनी यापूर्वीच धमकी दिल्याचे समजते. त्यानंतर आरोपींच्या आईने संतापाच्या भरात मुलांना चाकू दिला. चाकू हातात पडताच मुलांनी संतापाच्या भरात कुटुंबातील सदस्यांवरच बेदम हल्ला चढविला. या अचानक झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सदस्य उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.


या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. घटनेचे नेमके कारण काय, तसेच आरोपींवर कोणती कारवाई होणार, याबाबतची तपासणी सुरू आहे.




Post a Comment

0 Comments