वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
बुलढाणा प्रतिनिधी : शेख हसन
बुलढाणा – वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व समता सैनिक दलाचे सर्व सैनिक यांना कळविण्यात येते की, पूज्य भदंत तन्हणकर महाथेरो यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता तपवन महाप्रज्ञागिरी, टेंभुर्णा येथे होणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून अभिवादन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा कार्यक्रम पूज्य भदंत राज ज्योती, पूज्य भदंत सूर्य ज्योती व पूज्य भदंत धम्मदूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.


Post a Comment
0 Comments