वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
रितेश साबळे
अनुसूचित जाती-जमातींच्या आश्रमशाळा आज लुटीचे अड्डे बनल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तसेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षांच्या पाठबळामुळे संस्थाचालक आणि राज्यकर्ते संगनमत करून ही लूट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आश्रमशाळांमध्ये लैंगिक अत्याचार, खून यांसारख्या गंभीर घटना घडल्या असल्या तरी अद्यापपर्यंत ना व्यवस्थापन दोषी ठरले, ना शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाई झालेली आहे.
विशेष म्हणजे, केवळ राजकारणीच नव्हे तर सामाजिक न्याय, आदिवासी आणि ओबीसी विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनीसुद्धा आपल्या नातेवाईक व कुटुंबीयांच्या नावाने बेकायदेशीररीत्या आश्रमशाळा सुरू करून त्यातून अपार आर्थिक लाभ घेतल्याचे आरोप आहेत.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांची सुरू असलेली लूट तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
: राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी

Post a Comment
0 Comments