खड्ड्यान मुळे नागरिक,वाहनचालक, कॉलेज विद्यार्थी त्रस्त
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
दिनेश घनघाव
शहापूर तालुक्यातील शहापूर ते आसनगाव रेल्वे स्टेशनला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 3 च्या पुला खाली मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. पाऊसच साचलेलं पाणी, खड्डे चुकवण्यासाठी थांबलेल्या वहानानमुळे होणारी रहदारी या कारणाने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तर या खड्ड्यांना कायमस्वरूपी बूजविण्याची तसदी संबंधित विभाग घेत नसून नागरिकांकडून संतापची लाट उसळली आहे. या खड्ड्यांमध्ये वाहने आदळत असल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे तर चालकांना,विद्यार्थ्यांना, रुग्णांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, लवकरच गणेश उत्सव सुरु होत आहे तरी प्रशासनान ह्या कडे लक्ष देऊन हे खड्डे बुजवतील का..? हा प्रश्न नागरिकांना पडत आहे.


Post a Comment
0 Comments