वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
बुलढाणा प्रतिनिधी:-शेख हसन
बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबोळ येथील शंकर रामदास गाडेकर हे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 3 वाजता घरून बाहेर पडले होते. त्यानंतर ते परत न आल्याने गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. 18 ऑगस्ट रोजी टाकळी खोजबोळ पासून कळबी, जोगलखड, सावरपाटी, झुरळ या परिसरातील संपूर्ण जंगल पायमोपे तपासण्यात आले. मात्र, गाडेकर यांचा काहीही मागमूस लागला नव्हता.
गावातील प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने शंकर गाडेकर यांना शोधण्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र आज, 24 ऑगस्ट रोजी, अखेर शंकर गाडेकर यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे टाकळी खोजबोळ गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

Post a Comment
0 Comments