वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
परभणी प्रतिनिधी – पंकज चव्हाण
जिंतूर : जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांचे बुधवारी ढोल-ताशांच्या गजरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
सकाळपासूनच सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुका काढून गणपती बाप्पाचे आगमन केले. वाडी रस्त्यावर मिरवणुकीनंतर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच गावातील अनेक घरांमध्येही गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. कुऱ्हाडी गावात एकूण चार ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती बसविल्या आहेत.
गावातील पोलीस पाटील यांनी प्रत्येक मंडळातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. या वेळी बंडू चव्हाण, सुनील राठोड, देविदास इंजे, आसाराम गवळी, पंकज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments