![]() |
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सरकारी तसेच धर्मादाय रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, प्रमुख आणि नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते सहभागी झाले होते. ही बैठक डॉ. शुक्ला यांच्या दालनात पार पडली.
बैठकीत सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना मोफत आणि सवलतीच्या दरात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळवून देण्यासाठी एकूण १९ मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. NDMJ चे राज्य सचिव वैभव गीते यांनी शासन निर्णय, कायदे आणि परिपत्रकांचा संदर्भ देत धर्मादाय रुग्णालयांनी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक रुग्णाला उपचार द्यावेत, अशी ठाम भूमिका मांडली. त्यांनी पुढे सांगितले की, अनामत रक्कम न घेता सर्व रुग्णांना योजनांअंतर्गत मोफत औषधे आणि सेवा द्याव्यात, अन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.
बैठकीत हजर असलेल्या रुग्णालय प्रमुखांनी त्यांच्या संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि सेवा यांची माहिती दिली. यावेळी बाई रुक्मिणी हॉस्पिटल, कल्याण व शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली या सरकारी रुग्णालयांमधील सुविधा अधोरेखित करत डॉ. शुक्ला यांनी माहिती दिली. यावर वैभव गीते यांनी MRI, सिटीस्कॅन व इतर तपासण्या सर्वसामान्य रुग्णांसाठी मोफत करण्याची मागणी केली.
प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी धर्मादाय रुग्णालयांना उच्च न्यायालयाचे आदेश, शासनाचे परिपत्रक आणि धर्मादाय आयुक्तांचे निर्देश लक्षात घेऊन तात्काळ अमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.




Post a Comment
0 Comments