वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
{संपादकीय}
शेतरस्त्यांवरील अतिक्रमण हटवताना आता तहसीलदारांना पोलिसांकडून निःशुल्क बंदोबस्त मिळणार आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा देणारा हा महत्त्वाचा निर्णय आहे.
नकाशावरील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करताना, रस्त्यांची मोजणी किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 तसेच मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 च्या कलम 5 अंतर्गत रस्ते निर्माण करताना तहसीलदारांनी पोलिस संरक्षणाची मागणी केल्यास, गृह विभागाच्या धोरणानुसार ते मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर लातूरचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अमोलजी तांबे आणि सोलापूर ग्रामीणचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुलजी कुलकर्णी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, तहसीलदारांकडून मागणी झाल्यास शेतरस्ते अतिक्रमणमुक्ती मोहिमेसाठी निःशुल्क पोलीस बंदोबस्त द्यावा.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मालकी हक्कांचे रक्षण होणार असून, प्रशासनाची कार्यवाही अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल. हळूहळू राज्यभरातील सर्व जिल्ह्यांत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.


Post a Comment
0 Comments