वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
जनूना (ता. खामगाव, जि. बुलढाणा) – भरत शेजव हे समाजसेवेसाठी तत्पर, संत गाडगे महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असलेले एक समाजभान असलेले व्यक्तिमत्त्व. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार, जनूना येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक रितेशजी साबळे, बुलढाणा जिल्हा प्रमुख शेख हसन, तसेच जालना येथील मित्र गोरखनाथ राठोड हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत गावचे सरपंच, रमाई महिला मंडळ, युवक वर्ग, विचारवंत मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भरत भाऊ शेजव यांच्या जन्मदिनानिमित्त गावात सामाजिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रितेश साबळे यांनी संविधान, हिंदू कोड बिल, महिलांचे हक्क, शारीरिक शिक्षण, तसेच पुरुष व महिला यांना कायद्याने मिळालेल्या अधिकारांबाबत उपस्थितांना सोप्या आणि प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले.
विशेषतः बाप-मुलीच्या नात्याशी संबंधित कायदेशीर बाबी आणि जनसुरक्षा कायद्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. उदाहरणासहित केलेले विवेचन उपस्थितांच्या मनावर ठसले.
साबळे यांनी समाजाला सजगतेचा इशारा देत सांगितले की, "येणारा काळ अतिशय कठीण असू शकतो. जर आपण आज जागे झालो नाही, तर उद्या पश्चाताप करून उपयोग नाही." त्यांच्या ठाम आणि प्रभावी भाषणामुळे उपस्थितांमध्ये जागृतीची ठिणगी पडली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोधाचार्य . शुद्धोदन शेजव, राजीक शेख सर, गावचे सरपंच आणि ग्रामस्थांचे विशेष कौतुक करण्यात आले.
![]() |
रमाई महिला मंडळाने घेतलेली आघाडी विशेष उल्लेखनीय होती. त्यांच्या उत्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमास विशेष गती मिळाली.
विशेष आभार
कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये नेहमी पुढाकार घेणारे आणि सामाजिक कार्यात सतत सक्रिय असलेले राजू खंडेराव यांचाही यावेळी सत्कार करून सन्मान करण्यात आला. त्यांच्या मैत्रीपूर्ण सहकार्यामुळे सर्व कार्यक्रम अधिक प्रभावीपणे पार पडला. त्यांना मान देत उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.तसेच पंचशील बहुउद्देशीय क्रीडा मंडळ जनूना या सर्वांची उपस्थिती होती .




Post a Comment
0 Comments