वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर : दिः 21 - 2025 . शहरातील एका तरुणाने घरातील गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून प्राण संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत २० वर्षीय ओम राठोड या CA अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या स्फोटाने परिसर हादरून गेला असून घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
ही घटना २१ ऑगस्टच्या रात्री घडली. ओम राठोड हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तथापि, आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवलेली आढळली नाही. त्यामुळे या आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.
स्फोटाचा आवाज मोठा झाल्याने शेजारी धावून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. घराचे छत, भिंती व आतील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने इतर कोणीही जखमी झाले नाही.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांमधील वाढता मानसिक तणाव आणि त्यातून होणारे गंभीर परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांना आळा घालण्यासाठी मानसिक आरोग्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे.


Post a Comment
0 Comments