Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

संभाजीनगरमध्ये आवारा कुत्र्याचा हैदोस; वृद्ध जखमी, नागरिकांत भीतीचे वातावरण


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻

रितेश साबळे 

छत्रपती संभाजीनगर (१८ ऑगस्ट २०२५): शहरातील आवारा कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, एका भटक्या कुत्र्याने तब्बल १४ नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक मालिका समोर आली आहे. यामध्ये काल घडलेली ताजी घटना CIDCO टाऊनशिप परिसरातील आहे.



संकरी गल्लीतून जात असताना एका वृद्ध व्यक्तीवर कुत्र्याने अचानक झडप घालत चेहऱ्यावर व हातावर गंभीर जखमा केल्या. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.


गेल्या काही दिवसांत याच कुत्र्याने शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांवर हल्ले केले आहेत. पीडितांना तात्काळ सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून अँटी-रेबीज उपचार देण्यात आले आहेत.




या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे. “आवारा कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची मोहीम हवी, नसबंदी अभियान प्रभावीपणे राबवावे,” अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


दरम्यान, महापालिकेच्या पथकाने संबंधित कुत्र्याचा शोध सुरू केला असून, नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments