वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
मनोहर गायकवाड
मुंबई- सांताक्रुज मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३२ वर्षे महिलेने एका तांत्रिकावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनं भुतबाधेपासून मुक्त करण्यात साठी विधी करण्यास सांगितले.महिलेला बोलून घेतले नंतर जबरदस्ती करत महिलेच्या अब्रूचे लचके तोडले, अशी माहिती पिढीतानं दिली. यानंतर महिलेने थेट सांताक्रुज पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे
आरोपी अब्दुल रशीद (वय वर्ष ४५ ) असे आरोपी तांत्रिकाचे नाव आहे. त्याने ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कुटुंबातील समस्या आणि आरोग्याच्या समस्यामुळे पिढीत मुलगी त्रस्त होती. मदतीसाठी तिने तांत्रिक बाबाकडे धाव घेतली. आरोपीने पिडितेला भूतबाधा झाले असल्याचं सांगितले.
अंगातील भूत उतरवण्यासाठी तांत्रिकाने पिडितला विधी करण्यास सल्ला दिला.ऑगस्टच्या सुरुवातीला आरोपींनी पीडित महिलेला भेटण्यासाठी बोलून घेतले नंतर तिच्या वर जबरदस्ती करत बलात्कार केला सुरुवातीला महिलेला वाटले की हे कृत्य उपचाराचा एक भाग आहे. परंतु नंतर तिला समजले की तिची फसवणूक झाली आहे. त्यानंतर महिलेने सांताक्रुज पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अब्दुल रसिद फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.


Post a Comment
0 Comments