वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
किन्हवली (शंकर गायकवाड) :
किन्हवली भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक पातळीवरील दिग्गज युवा नेते निखिल धानके, सुनील धानके, नकुल निमसे यांनी उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना शिंदे गटात दाखल होताना निखिल धानके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, “जनतेच्या विकासासाठी आणि प्रदेशातील प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे गट हे सक्षम नेतृत्व आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनांवर माझा पूर्ण विश्वास आहे.”
यामुळे ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिक पातळीवर धानके यांच्या पाठिंब्यामुळे ठाकरे गटाचे संघटनात्मक बळ ढासळणार, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, कल्याण, नागपूर आदी ठिकाणी झालेल्या गळतीनंतर आता किन्हवलीत झालेल्या या प्रवेशामुळे ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेला आणखी गती मिळाली असून, आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट अधिक बळकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Post a Comment
0 Comments