वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
शहापूर (संपादकीय) :
आंबेडकरी चळवळीतील तडफदार वाघ म्हणून ओळखले जाणारे, भीमा कोरेगाव चौकशी आयोगातील आंबेडकरी समाजाचे प्रमुख वकील व आरपीआय (सेक्युलर) महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ॲड. किरण चन्ने यांच्यावर अलीकडेच भ्याड हल्ला करण्यात आला. तसेच सोशल मीडियावर त्यांचे अर्धवट व खोटे व्हिडिओ पसरवून त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा तीव्र निषेध शहापूर तालुक्यातील आरपीआय (सेक्युलर) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून यासंदर्भात शहापूर तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
न्याय व चौकशीची मागणी
आरपीआय (सेक्युलर) शहापूर तालुका वतीने देण्यात आलेल्या निवेदनात ॲड. किरण चन्ने यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद करण्यात आले. एका धडाडीच्या नेत्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे व्हिडिओ तयार करून पसरवले जात आहेत, असा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर चन्ने यांना न्याय मिळावा तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन प्रसंगी उपस्थित मान्यवर
निवेदन देताना अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये –
मा. गुरुनाथ गायकवाड (राज्य संघटक, आरपीआय सेक्युलर)
मा. प्रविण केदारे (ठाणे जिल्हा सहसचिव)
मा. फिरोझ शेख (शहापूर तालुका अध्यक्ष)
सामाजिक कार्यकर्ते मा. अनिलभाई कांबळे
पत्रकार मा. रवींद्र जाधव
सामाजिक कार्यकर्ते मा. हरेश सोनवणे
मा. विकास वाढविंदे (युवा अध्यक्ष, शहापूर तालुका)
मा. जोसेफ डिसुझा (उपाध्यक्ष, शहापूर तालुका)
मा. किरण शिंदे (बीएसपी कार्यकर्ते)
मा. महेश भालेराव (खजिनदार, वाशीद शहर)
न्यायासाठी ठाम लढा देण्याचा निर्धार
या वेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, ॲड. किरण चन्ने यांच्यासारख्या लढवय्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते एकदिलाने त्यांच्यासोबत उभे आहेत. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत व न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


Post a Comment
0 Comments