वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी:-मोहन दिपके
महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन शांत होत असतानाच, सरकारने काढलेल्या नव्या जीआरनुसार मराठा समाजाच्या नोंदी हैदराबाद गॅझेटनुसार ग्राह्य धरून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर इतर समाजांकडूनही हैदराबाद गॅझेटमध्ये असलेल्या त्यांच्या नोंदीप्रमाणे आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे.
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाची नोंद एस.टी. प्रवर्गात असल्यामुळे, बंजारा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रात एस.टी. प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी आज जिंतूर तालुक्यात गोर सेनेच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात गोर सेनेचे शेषराव चव्हाण, संतोषभाऊ राठोड, रमेश राठोड, अनिल राठोड, रवी राठोड, विष्णू चव्हाण यांच्यासह बंजारा समाजातील हजारो महिला-पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.



Post a Comment
0 Comments