वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
नवी दिल्ली – नेपाळमध्ये अलीकडेच न्यायव्यवस्थेच्या इमारतीला आग लावण्यात आली असून या घटनेने शेजारी राष्ट्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भारत सरकारला इशारा दिला आहे.
"नेपाळ आणि बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात निर्माण होऊ नये यासाठी शासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. भ्रष्टाचार थांबवून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. अन्यथा लोकांचा संताप उफाळून येण्याची शक्यता आहे," असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, "भारतातील न्यायव्यवस्था, प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय केंद्रे यांनी आता सामान्य माणसाच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलली पाहिजेत. अन्यथा देशात असंतोष वाढेल आणि नेपाळमध्ये जशी घटना घडली तशीच परिस्थिती येथेही पाहायला मिळू शकते."
आंबेडकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.


Post a Comment
0 Comments