वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
पैठण – *कार्यकारी संपादक रितेश साबळे*
जायकवाडी (नाथसागर) धरण 100% भरल्याने आज पहाटे तीन वाजता धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून तब्बल १ लाख १५ हजार क्यूसेक्स पाणी विसर्गास सुरुवात करण्यात आली आहे.
काल दिवसभर व रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात ८३,४८९ क्यूसेक इतका वेगाने आवक सुरू होती. त्यामुळे धरणाचे नियमित १८ दरवाजे व उर्वरित आपत्कालीन ९ दरवाजे मिळून एकूण २७ दरवाजे ३ फूट उंचीने उघडण्यात आले.
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी नदी पात्रात पाणी पातळी झपाट्याने वाढत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोदावरी पात्रातील विसर्ग सध्या दीड लाख क्यूसेक्सपर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नाशिक व नगर जिल्ह्यातील तसेच जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने आणखी पाण्याचा आवक वाढण्याची शक्यता असून धरण प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज ठेवण्यात आला आहे व नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments