वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
मोहनजी दिपके
हिंगोली – गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोलीतील ईसापूर व सिद्धेश्वर धरणे शंभर टक्के भरल्याने त्यांच्या दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये व शेतांमध्ये घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या सोयाबीन पिकाचा हंगाम सुरू असला तरी सततच्या पावसामुळे पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. शेंगा न लागता फक्त पानेच वाढलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय हळद, कापूस यांसारख्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या परिस्थितीत जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना आणि पक्षांनी शासनाकडे तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याची, तसेच पिक विमा आणि शासकीय मदत तातडीने देण्याची मागणी केली आहे.



Post a Comment
0 Comments