वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक :रितेश साबळे.
जालना – अखिल भारतीय बंजारा आरक्षण समिती, जालना यांच्या वतीने बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ रोजी (सोमवार) भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा *मोर्चा आंबट चौफुली* , जालना येथे काढण्यात आला होता.
*बंजारा समाजाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या :*
१) बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात सामावून घ्यावे.
२) हैद्राबाद गॅझेट तात्काळ लागू करावे.
३) सी.पी. बेरा गॅझेट लागू करावे.
" *उठ बंजारा जागा हो, एसटी आरक्षणाचा धागा हो"* या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या मोर्चामध्ये बंजारा समाजातील लाखोंच्या संख्येने नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
समाजाच्या हक्कांसाठी सर्व वयोगटातील पुरुष, महिला आणि युवक मोठ्या उत्साहाने रस्त्यावर उतरले होते.
या मोर्चाच्या माध्यमातून बंजारा समाजाने सरकारकडे आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका मांडली.



Post a Comment
0 Comments