वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज ✍🏻
संपादकीय
नाशिक – विल्होळी येथील जगदीश काळू आल्हाट (वय 34) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकस्मात निधन झाले. अमर भरीत यांचे भाचे व विजय आल्हाट यांचे मोठे बंधू असलेले जगदीश अतिशय मनमिळावू व मदतीस तत्पर स्वभावाचे होते. त्यांच्या अकस्मात जाण्याने विल्होळी व नाशिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जगदीश यांच्या निधनानंतर आल्हाट कुटुंबाने समाजाप्रती संवेदनशील भूमिका घेत दिवंगताचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. वेळेअभावी इतर अवयव दान करता आले नाहीत; मात्र नेत्रदान करण्यात यश आले. नेत्रपेढीच्या डॉक्टरांच्या माहितीनुसार, या नेत्रदानातून किमान एका तर जास्तीत जास्त चार व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे.
"जगदीशचे डोळे आता इतरांना जग दाखवतील; आमचा जगदीश कुठेतरी जिवंत राहील, हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे," अशा शब्दांत अमर भरीत यांनी कुटुंबाच्या भावना व्यक्त केल्या.
जगदीश जिवंतपणी इतरांच्या मदतीला धावून जाणारा होता. मृत्यूनंतरही त्याचे डोळे कोणाच्यातरी जीवनात प्रकाश आणणार आहेत. अशा दुःखद प्रसंगीही आल्हाट कुटुंबाने घेतलेला नेत्रदानाचा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.


Post a Comment
0 Comments