वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्युज✍🏻
मनोहर गायकवाड
मुंबई – चैत्यभूमीचे शिल्पकार व भारतीय बौद्ध महासभेचे आधारस्तंभ, आंबेडकरी चळवळीचे स्वाभिमानी व झुंजार नेते, माजी आमदार सूर्यपुत्र आदरणीय यशवंत (भैय्यासाहेब) भीमराव आंबेडकर यांच्या ४८व्या स्मृती दिनानिमित्त आज चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी आंबेडकर कुटुंब, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तसेच समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भैय्यासाहेबांना आदरांजली वाहिली. समता सैनिक दलाच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करत समाज परिवर्तनासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
यशवंत (भैय्यासाहेब) आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योग्य वारसदार ठरले. त्यांनी डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा व मानवतेचा वारसा आयुष्यभर जपला आणि पुढे नेला. भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या माध्यमातून त्यांनी समाज संघटित केला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण-तरुणींना आंबेडकरी चळवळीतील कार्याचा ध्यास लाभला.
आज त्यांच्या स्मृती दिनी त्यांचे विचार, संघर्ष आणि जीवन समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. समानता, बंधुता आणि न्याय टिकवण्यासाठी त्यांच्या कार्याचा वारसा जपणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे उपस्थितांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments