वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍🏻
कार्यकारी संपादक :रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यातील Aurangabad Industrial City (AURIC) हे औद्योगिक केंद्र देशातील इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादनाचे महत्वाचे हब म्हणून उदयास येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, AURIC मध्ये सध्या सुमारे ₹71,000 कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. या गुंतवणुकीमुळे सुमारे 62,000 रोजगारनिर्मिती होईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (DMIC) यामुळे संभाजीनगर गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठिकाण बनले आहे. AURIC च्या सहा वर्षांच्या विकासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, येथील औद्योगिक विकासामुळे प्रदेशाच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळत आहे.
शेंद्र-बिडकीन परिसरात उभारण्यात आलेल्या AURIC मध्ये देश-विदेशातील मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक होत आहे. इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी निर्मिती, ऑटोमोबाईल पार्ट्स यासह विविध उद्योग येथे स्थापन होत आहेत. यामुळे मराठवाड्याच्या औद्योगिक प्रगतीला नवीन दिशा मिळणार असून युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.
या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औद्योगिक नकाशावर ठळकपणे झळकणार आहे.



Post a Comment
0 Comments