Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वेल्डिंग करताना भीषण स्फोट –टँकरमध्ये उतरून युवकाचा जागीच मृत्यू, दोनजण जखमी.


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्युज ✍🏻

 रितेश साबळे.

छत्रपती संभाजीनगर – शहरातील शेंद्रा एमआयडीसी परिसरात काल (१५ सप्टेंबर) सायंकाळी भीषण अपघात घडला. इथेनॉल टँकरमध्ये उतरून वेल्डिंगचे काम करत असताना टँकरचा स्फोट झाला. या स्फोटात वेल्डर लक्ष्मण विनायक कुबेर (वय ३२, रा. गेवराई कुबेर) याचा आत होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा एमआयडीसी येथील हरमन कंपनीजवळील प्लॉट क्र. ६८ येथे वेल्डिंगचे वर्कशॉप आहे. काल सायंकाळी एम.एच २० जीसी ३२८८ क्रमांकाचा इथेनॉल टँकर येथे आला. टँकर चालकाने वेल्डिंगचे काम करण्यासाठी सांगितले. वेल्डर लक्ष्मण कुबेर टँकरमध्ये उतरून वेल्डिंग सुरू करताच टँकरमधील वायू मिश्रण पेट घेतल्याने भीषण स्फोट झाला.


स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला. स्फोटामुळे लक्ष्मण कुबेर यांचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष वैजनाथ महानोर (वय ३५, रा. शेकटा, ता. गेवराई, जि. बीड) आणि रमेश रामदास गावडे (वय २२, रा. धुळे) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


घटनेनंतर करमाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अपघाताचा पुढील तपास करमाड पोलीस करत आहेत.


या भीषण घटनेमुळे शेंद्रा एमआयडीसी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. औद्योगिक परिसरातील सुरक्षा नियमांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.


Post a Comment

0 Comments